कथा ,पुराणे नाही नुसते, समृध्द हा इतिहास
तथ्य जाणूनी घेऊ त्यातले,नकोच नुसता भास
किती पुरातन आहे सारे,घडले कधी अन् कसे?
जाणून घेऊ सारे आपण,जसेच घडले तसे.
आपला भारत देश, आपली भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे,पुरातन आहे याविषयीचे अनेक समज – गैरसमज आहेत.भारतीय संस्कृती म्हणजे केवळ कथा,पुराणे एवढेच नाही तर त्याहीपलिकडे आपला एक इतिहास आहे.
मुळात इतिहास म्हणजे सनावली आणि पुराण कथा नाही,तर इतिहास म्हणजे धर्म,अर्थ,काम,मोक्ष यासाठी आधी घडलेल्या घटना कथा स्वरूपात प्रस्तुत करून पुढील पिढ्यांना दिलेला उपदेश आहे. रामायण,महाभारत हे सुद्धा याचाच एक भाग आहेत.भारतीय संस्कृतीचा विस्तार, आवाका आणि मुळात या अतिप्राचीन संस्कृतीने जगाला दिलेली देणगी म्हणजे आपला इतिहास आहे.संस्कृत भाषा,खगोलशास्त्र आणि गुरू – शिष्य परंपरा ही आपण जगाला दिलेली देणगी आहे.आपल्या कथा,पुराणे आणि परंपरा या सगळ्या अतिशय शास्त्र संमत, कालातीत आहेत,असे का म्हणावे?त्याला पुरावा काय?खरचं असं होतं का? या सनातन संस्कृतीचा ‘ खरा ‘ इतिहास जाणून घ्यायची इच्छा आपणा सर्वांचीच आहे.
इतिहासाची ही पाने आपल्या समोर उलगडून दाखवणार आहेत श्री.नीलेश ओक.मुळात रसायनशास्त्र या विषयाची अभियांत्रिकी पदवी असणारे नीलेशजी अमेरिकेतील संस्थेत संशोधक आणि अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत.भारतीय संस्कृतीच्या पुरातनतेचे भान आणून देण्यासाठी त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे.अनेक यू ट्यूब चॅनेल वर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत.ते आपला युक्तीवाद शास्त्रीय पद्धतीने,वस्तुनिष्ठ आणि तार्किक कारणमीमांसेतून करतात.ज्याप्रकारे आपल्या संस्कृतीचे बनावट सादरीकरण केले जाते ,ते चुकीचे कसे आहे आणि आपल्या संस्कृतीचे खरे,संपन्न आणि समृद्ध स्वरूप जाणून घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असा कार्यक्रम नाशिककरांसाठी घेऊन येत आहोत..
आयाम नाशिक आयोजित,
हिंदू संस्कृतीचा समृध्द इतिहास.
दिनांक – 4 ऑक्टोंबर 2024
वेळ – सायंकाळी 6 ते 8.30
स्थळ:- शंकराचार्य संकुल,कुर्तकोटी सभागृह,गंगापूर रोड,नाशिक
चला तर मग साक्षीदार व्हा….ख- या,समृध्द इतिहासाचे…