“हिंदू संस्कृतीचा इतिहास खरचं खूप समृध्द आहे.रामायण महाभारत हे म्हणजेच इतिहास नाही त्याहीपलीकडे आपला इतिहास आहे”.आयाम नाशिक आयोजित हिंदू संस्कृतीचा समृध्द इतिहास हा कार्यक्रम नुकताच कुर्तकोटी सभागृह,शंकराचार्य न्यास,गंगापूर रोड नाशिक येथे पार पडला.त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,” चांद्रमास, सूर्यमास ही कालमापनाची साधने होती. पुराणे हे आपले आधार होते.रामायण , महाभारत यामध्येही अनेक खगोल शास्त्रीय पुरावे आहेत.त्यावरून ते कधी घडले असावे ते सांगता येते.हेच नाही तर ऋग्वेद व इतर वेद हे सुध्दा किती पुरातन आहेत,हे सांगता येते. पाश्चिमात्य देशांना इतका पुरातन इतिहासच नाही.आपल्याला कोणत्याही पुरातत्व पुराव्याची गरज नाही कारण ते आपल्या ग्रंथात आधीच सांगितलेले आहे”.शेती,हवामान,भूगोल,खगोलशास्त्र याचेही पुरातनत्व त्यांनी समजावून सांगितले.दृक श्राव्य माध्यमाच्या साहाय्याने त्यांनी सर्वच मुद्दे अगदी सखोलतेने समजावले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ,आयाम नाशिकचे अध्यक्ष डॉ.भरत केळकर होते.त्यांच्या प्रास्ताविकात ते म्हणाले की ,” आपल्याला ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला हवा ते राम कृष्ण आपण पुराण समजलो.आपली ही श्रद्धा स्थाने डळमळीत केली गेली.त्यामुळे हे सर्व सत्यच आहे हे सांगणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे एखादा विमर्श चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होणार नाही.यासाठीच आयाम अशा कार्यक्रमाची योजना करते.”
पाहुण्यांचा परिचय सुनेत्रा मांडवगणे यांनी केला .सत्कार डॉ.भरत केळकर यांनी केला. श्री.विवेक बापट ( कार्यवाह,आयाम नाशिक) यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले. वंदे मातरम् चे गायन रसिका देसाई यांनी केले.
हिंदू संस्कृतीविषयी खरी माहिती जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने कार्यक्रमास नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नाशिकमधील विविध संस्थांचे मान्यवर , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयाम,नाशिक समितीचे सदस्य मिलिंद कुलकर्णी,शुभदा देसाई, आर्चीस कुलकर्णी,स्वरदा कुलकर्णी, तुषार मिशाळ,कौमुदी परांजपे यांचा सहभाग होता.