निःस्वार्थ सेवेला मिळाला शासकीय दरबारी सन्मान
वनवासी कल्याण आश्रमाच्या चैत्राम जी पवार यांना आज मिळणार पद्मश्री पुरस्कार.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा या आदिवासी पाड्याच्या पुनरुत्थाना साठी आदरणीय चैत्राम पवार यांनी केलेले कार्य आज देशासाठी आदर्श ठरले आहे.400 हेक्टर जंगलाचे संरक्षण आणि 5000 हून अधिक झाडांची लागवड आणि जैव विविधतेचे संवर्धन त्यांनी केले आहे.या कार्यामुळे बारीपाडा या गावास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.आता भारत सरकारच्या प्रतिष्ठित अशा पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.त्यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड अतिशय सार्थ आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण राष्ट्रपती भवनात होणार आहे. आदिवासींना शाश्वत विकासाचा मार्ग दाखणाऱ्या या महानायकास त्रिवार वंदन.

